मुख्य सामग्रीवर वगळा

वाचन कट्टा चर्चा ७

मार्टिन ल्युथर किंग यांचे I have a Dream हे आत्मचरित्र विद्यार्थीदशेत वाचणे किती महत्त्वाचे आहे, हे डॉ. तुषार घोरपडे यांनी सांगितले. त्यांनी एका व्हिडिओची शिफारस केली. तो देखील आवर्जून एकत्रित पाहिला. https://youtu.be/hZ-SbOFas1k?si=cPbJcW3kV6-pYrsS हा व्हिडिओ अवश्य बघा. Scientific temper या विषयावर आहे. त्यातून obscurantism हा नवीन शब्द कळला. अर्थ : the practice or policy of deliberately making something difficult to understand, especially in order to stop people from knowing ideas, facts, etc. (जाणूनबुजून काहीतरी समजण्यास कठीण बनवण्याचे धोरण, विशेषत: लोकांना कल्पना, तथ्य इ. जाणून घेण्यापासून रोखण्यासाठी.) Obscurantism पासून वाचण्यासाठी आपण वाचले पाहिजे, हे प्रकर्षाने जाणवले.
तसेच गेल्या दोन दिवसांतील लोकसत्ता संपादकीय; नेहरूंना मुक्ती आणि नेहरू मुक्तीनंतर यावर चर्चा करण्यात आली. हे दोन्ही अग्रलेख कलम 370 हटवण्याबाबतच्या निर्णयाबाबत, त्याचा इतिहास, पंडित नेहरू यांची तत्कालीन भूमिका (both stand and role) याबाबत चर्चा करतात. हे दोन्ही अग्रलेख येथे जोडत आहे. वाचकांना विषय सुचाविण्याचे आवाहन करण्यात आले. सहभागी विद्यार्थिनी आपण वाचत असलेल्या Rich Dad Poor Dad आणि गुंतवणुकीचे शास्त्र या पुस्तकांबद्दल व्यक्त झाल्या. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कट्टा चर्चा १०

चालू घडामोडींवर आज चर्चा झाली. डॉ. तुषार घोरपडे सरांनी २०११ नंतरच्या अण्णा आंदोलन, केजरीवाल यांचा उदय आणि आजच्या राजकीय स्थित्यंतर इथपर्यंत चर्चा केली. डॉ. किरण गाढवे सरांनी नाटक, साहित्य, अभिव्यक्ती या विषयावर प्रकाश टाकला. 

पुस्तक परिचय: विनायक होगडे लिखित डियर तुकोबा

#डियर_तुकोबा विनायक होगाडे यांची डियर तुकोबा ही कादंबरी वाचली. त्याबद्दल शेअर केल्यावाचून राहवत नाही. तुकोबा आणि अनेक देश परदेशातील विचारवंत यांची भेट काव्यरुपात पुस्तकाच्या सुरवातीला विनायक होगडे यांनी घडवली आहे. प्रत्येक भेट अंगावर काटा आणत आहे. प्रत्येक ओवी अंगावर शहारे आणते. या सगळ्या कविता घरातल्या ,शाळा, कॉलेजच्या भिंतीवर लिहून काढाव्या, असे वाटते. या सर्व भेटी होत असताना आपण त्याचे साक्षीदार आहोत असा भास होतो. डोळे पाणावतात. मीडिया trial मध्ये संतूच्या जागी, मुकाच्या जागी आपल्याच भावना आहेत असे वाटते.   डोळे डबडबले, जेव्हा हे वाचले.   "आवलीने दिली डब्यामध्ये खीर, घेई कर्मवीर लक्ष्मी साठी  किती तिच्या खस्ता विके मंगळसूत्र, झुरे दिनरात्र पोरांपायी  साऊची छाया तिच्या ठाई हाय, थोर तीही माय लेकरांची  भाऊंनी धरले पाया आवलीचे, बांध आसवांचे फुटलेले"  तुकोबा आणि गांधी भेटीत: "शोधला तो गाभा, भारताचा तुकोबांच्या खांद्यावर गांधी.."  असे अनेक विचारवंत तुकोबांच्या खांद्यावर बसले आणि म्हणून त्यांना आपला समतावादी, विवेकवादी संघर्ष यशस्वी करता आला. ...

वाचन कट्टा चर्चा ५

मोठ्या संख्येने वाचकांनी, विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आज कट्ट्यावर हजेरी लावली. कट्ट्यावर दिवसेंदिवस वाचकांची संख्या वाढत आहे हे आशादायी चित्र आहे. वेगवेगळ्या विषयांवर, पुस्तकांवर, चालू घडामोडींवर चर्चा केली.  माणूस पृथ्वीवर उपराच, तो आणि ती, नदिष्ट या पुस्तकांवर चर्चा झाली.  स्वामी विवेकानंद यांचे विचार, संत विचार, संत परंपरा, ज्ञानाचा प्रसार, ज्ञानाची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी केलेलं संतांच्या काळातील बंड आणि आजच्या काळापर्यंत त्याचे आलेले त्या बंडाचा वारसा याबाबत चर्चा झाली. श्रीकांत लक्ष्मी शंकर (मासूम) यांनी आज वाचन कट्ट्यामध्ये चर्चेसाठी हजेरी लावली. त्यांनी उपक्रमाचे कौतुक केले. यापुढेही ते कट्ट्यावर येत राहतील असे आश्वासन त्यांनी दिले. त्यांचे अनेक लेखक मित्र आहेत. त्यांच्या माध्यमातून लेखकांशी चर्चा घडवून आणली जाईल.