मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वाचन कट्टा चर्चा ५

मोठ्या संख्येने वाचकांनी, विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आज कट्ट्यावर हजेरी लावली. कट्ट्यावर दिवसेंदिवस वाचकांची संख्या वाढत आहे हे आशादायी चित्र आहे. वेगवेगळ्या विषयांवर, पुस्तकांवर, चालू घडामोडींवर चर्चा केली.  माणूस पृथ्वीवर उपराच, तो आणि ती, नदिष्ट या पुस्तकांवर चर्चा झाली.  स्वामी विवेकानंद यांचे विचार, संत विचार, संत परंपरा, ज्ञानाचा प्रसार, ज्ञानाची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी केलेलं संतांच्या काळातील बंड आणि आजच्या काळापर्यंत त्याचे आलेले त्या बंडाचा वारसा याबाबत चर्चा झाली. श्रीकांत लक्ष्मी शंकर (मासूम) यांनी आज वाचन कट्ट्यामध्ये चर्चेसाठी हजेरी लावली. त्यांनी उपक्रमाचे कौतुक केले. यापुढेही ते कट्ट्यावर येत राहतील असे आश्वासन त्यांनी दिले. त्यांचे अनेक लेखक मित्र आहेत. त्यांच्या माध्यमातून लेखकांशी चर्चा घडवून आणली जाईल. 

वाचन कट्टा चर्चा ४

आजच्या वाचन कट्ट्यात प्रदीर्घ मुक्त चर्चा, गप्पा, दृष्टिकोन यांचे आदानप्रदान झाले. हरारी, नादिया मुराद, सुधा मूर्ती, प्रवासवर्णने, शरद बाविस्कर, राजकीय संदर्भ, बुद्धीप्रामाण्यवाद, स्त्रीवाद, इ. वर बुद्धीला खुराक आणि मनाला उभारी देणारा संवाद झाला.

इकिगाई ❤️

इकिगाई हे पुस्तकं हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सेस्क मिरालेस या दोन लेखकांनी इंग्रजी मध्ये लिहिलेलं आहे.त्याला मराठीत प्रसाद ढापरे यांनी अनुवादीत केलेलं आहे. इकिगाई ही एक जपानी संकल्पना आहे.याचा अर्थ असा आहे की ‘आपल्या आवडीच्या कामात सतत व्यस्त राहण्यामध्ये असणारा आनंद’. जपानमधील लोक बाकी देशातील लोकांपेक्षा जास्त आयुष्य जगतात.त्याच कारण इकिगाई आहे.जपानी लोक कायम काम करत राहतात.इतरांना मदतीची भावना ठेवतात.अगदी साधा राहणीमान,सकस आहार,व्यायाम हीच यांच्या आरोग्याची कारण आहेतं. प्रत्येक जपानी माणुसं आपलाआपसा इकिगाई शोधुन आनंदी जगण्याचा प्रयत्न करत असतात.ते लोक जेवणाच्या अगोदर एक कडव म्हणतात ‘हारा हाची बु’ याचा अर्थ असा होतो की,तुमचं पोट ८०% भरेपर्यंतच जेवा.त्यामुळे पचन करायला लागणारी उर्जा वाचते. या जगामध्ये जर कायम आनंदी रहायचं असेल तर तुमच्याकडे काहीतरी करण्याचं ध्येय पाहीजे.ज्यावर मनापासुन प्रेम करावं असं काहीतरी तुमच्या आयुष्यात पाहीजे आणि जीवनामध्ये काहीतरी मिळवण्याची आशा असावी. या पुस्तकात इकिगाईचे दहा नियम दिले आहेत ते खालीलप्रमाणे.. १. कायम कार्यरत रहा आणि कधीही निवृत्त हो...

पुस्तक परिचय: डॉ. नरेंद्र दाभोलकर लिखित लढे अंधश्रद्धेचे

लढे अंधश्रद्धेचे या पुस्तकाचे लेखन डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अतिशय सुरेख व शास्त्रशुद्ध पद्धतीने लेखन केलेले आहे. सदर पुस्तकाचा भावार्थ व्यतीत करताना अतिशय आनंद होत आहे, की माझ्या मनामध्ये असलेल्या खुळचट कल्पना, रूढी, परंपरा (अंधश्रद्धा) याचं पूर्णपणे उच्चाटन करू शकलो. अर्थात पुस्तक समजावून घेत असताना त्यामध्ये असलेले शास्त्रक्त भाषा आणि उदाहरणाद्वारे समजावून सांगितलेली गोष्ट हे या पुस्तकाचे मूळ वैशिष्ट्य आहे. सदर पुस्तकांमधून वैज्ञानिक दृष्टिकोन कशा पद्धतीने विकसित करता येतो किंवा आपण धर्माच्या, जातीच्या बेड्यांमध्ये कशा पद्धतीने जखडलेलो आहोत आणि त्या सर्वांचा एकंदरीत परिणाम आपल्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक जडणघडणीमध्ये कसा होतो हे सांगण्याचा हट्ट या पुस्तकाच्या माध्यमातून झालेला दिसतो. अगदी तुकाराम महाराजांनी सांगितलेल्या अभंगाचा देखील दाखला दिलेला दिसतो. डोई वाढवूनी केस, भुते आणिती अंगात । ते नाही संतजन, तेथे नाही आत्मखूण ।। पुस्तकाचे नाव- लढे अंधश्रद्धेचे लेखक- डॉ. नरेंद्र दाभोलकर  प्रकाशन- साधना प्रकाशन, पुणे पृष्ठ संख्या- ३३६ पुस्तक परिचय: डॉ.सुभाष वाव्हळ

वाचन कट्टा चर्चा ३

वर्षभरातून एकदा वाचन प्रेरणा दिवस घेऊन ती वाचन प्रेरणा तेवत ठेवणे हे मोठेच आव्हान आहे. वाचन कट्ट्याच्या रूपाने अनेक वाचक वाचनप्रेमी एका व्यासपीठावर येऊन आपण वाचलेल्या पुस्तकाबद्दल चर्चा करतात असे आशादायी चित्र आपल्या महाविद्यालयाच्या वाचन कट्ट्यावर हळूहळू आकारास येत आहे. आजच्या वाचन कट्ट्यामध्ये डॉ. सुभाष वाव्हळ, अशोक कोंढावळे, रवी जाधव, स्मिता ढवळे, मयूरी जगताप, राजश्री शेंडकर, कल्पना कुचेकर, शैलेश राऊत, संतोष मोकाशी, संजय ढेरे, प्रकाश दरेकर आदी उपस्थित होते. शैलेश राऊत यांच्यासह अनेकांनी पहिल्यांदाच कट्ट्याला हजेरी लावलेली होती. कट्ट्याचा उद्देश आणि भूमिका यानुसार आजच्या कट्ट्यावर विविध उपस्थितांनी वाचलेल्या वेगवेगळ्या पुस्तकांवर चर्चा केली नुकत्याच झालेल्या अक्षरधाराच्या उद्घाटन प्रसंगी शरद बाविस्कर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली होती त्या कार्यक्रमाच्या बातमीबद्दल संतोष मोकाशी यांनी चर्चा केली. शरद बाविस्कर यांच्या बेधडकपणावर, समाजातल्या उणीवांवर बोट ठेवण्याचा त्यांचा स्वभाव आणि त्यांचं काम याबद्दल तसेच त्या अनुषंगाने त्यांच्या भुरा या पुस्तकाबद्दल देखील सुरुवातीला चर्चा झा...

वाचन कट्टा चर्चा २

आज वाचन कट्ट्यावर श्रीम. मीरा चिकने श्रीम. स्मिता ढवळे, राजेश सोनवणे, संतोष मोकाशी, दत्तात्रय संकपाळ अशोक कोंढावळे, प्रकाश दरेकर, भरत खोमणे, संजय ढेरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जयंती निमित्त डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना आदरांजली वाहण्यात आली. डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या जयंतीचे औचित्य साधून विनायक होगाडे लिखित डियर तुकोबा या पुस्तकातील तुकोबा दाभोळकर भेट या कवितेचे दत्तात्रय संकपाळ यांनी अभिवाचन केले. त्या कवितेवर सर्वांनी चर्चा केली. तुकोबांच्या काळातील सामाजिक संदर्भ, त्यांच्यानंतरच्या काळातील महात्मा फुले, डॉ आंबेडकर आणि अलीकडच्या काळातील डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या विचारांचे कार्याचे चिंतन सर्वांनी केले. प्रा. सोनवणे यांनी शरणकुमार लिंबाळे यांच्या 'वंदे मातरम' या कादंबरीविषयी चर्चा केली. त्यात लेखकाने केलेल्या मांडणीचे वैशिष्ट्य सांगताना, समाजातील वेगवेगळ्या अनुभवांशी आपण स्वतःला कसे जोडू शकतो. समाजातल्या वेगवेगळ्या प्रवृत्तींची ओळख होते आणि यातूनच आपण लोकांना कसे ओळखू शकतो हे कादंबरीचा निवेदक जीवनविषयक तत्त्वज्ञान मांडून, सामाजिक समस्या, आजच्या नव्या जातीभे...