सध्याच्या सामाजिक -राजकीय परिस्थितीवर वर्तमानपत्रात येणाऱ्या बातम्यांवर, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, पक्ष पक्षांतर यांच्या बद्दलच्या कायदेशीर बाबी, त्यासंबंधीत विविध तज्ञांची वर्तमानपत्र मध्ये आलेले लेख, नुकताच सामाजिक विषयावर- समाजसुधारकांच्या कर्तृत्वावर बेतलेला ' सत्यशोधक' या सिनेमाबाबत त्यातल्या विचाराबाबत चर्चा करण्यात आली. चर्चा केलेली पुस्तके: सार्वजनिक सत्यधर्म (ले. महत्मा फुले) आणि Atlas Shrugged by Ayn Rand. पियुष मिश्रा या कलाकाराबद्दल आणि त्यांनी लिहिलेल्या आत्मकथेबद्दल -तुम्हारी औकात क्या है पीयूष मिश्रा चर्चा केली. ग्रंथालयाने सुरू केलेले माहितीपर वृत्त संकलन बाबत माहिती दिली. तसेच सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक नावाच्या podcast बद्दल माहिती दिली.