वाचकांनी लिहिलेले पुस्तक परीक्षण, चर्चा, मुलाखती याठिकाणी त्यांच्या नावासह प्रकाशित होतील. वाचन कट्टा या उपक्रमाअंतर्गत 'मला भावलेले पुस्तक' या विषयावर चर्चा करण्यासाठी दर बुधवारी ११.३० ते १२.३० वा. या वेळेत ग्रंथालयात जमुया.
चालू घडामोडींवर आज चर्चा झाली. डॉ. तुषार घोरपडे सरांनी २०११ नंतरच्या अण्णा आंदोलन, केजरीवाल यांचा उदय आणि आजच्या राजकीय स्थित्यंतर इथपर्यंत चर्चा केली. डॉ. किरण गाढवे सरांनी नाटक, साहित्य, अभिव्यक्ती या विषयावर प्रकाश टाकला.