मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पुस्तक परिचय: विनायक होगडे लिखित डियर तुकोबा

#डियर_तुकोबा विनायक होगाडे यांची डियर तुकोबा ही कादंबरी वाचली. त्याबद्दल शेअर केल्यावाचून राहवत नाही. तुकोबा आणि अनेक देश परदेशातील विचारवंत यांची भेट काव्यरुपात पुस्तकाच्या सुरवातीला विनायक होगडे यांनी घडवली आहे. प्रत्येक भेट अंगावर काटा आणत आहे. प्रत्येक ओवी अंगावर शहारे आणते. या सगळ्या कविता घरातल्या ,शाळा, कॉलेजच्या भिंतीवर लिहून काढाव्या, असे वाटते. या सर्व भेटी होत असताना आपण त्याचे साक्षीदार आहोत असा भास होतो. डोळे पाणावतात. मीडिया trial मध्ये संतूच्या जागी, मुकाच्या जागी आपल्याच भावना आहेत असे वाटते.   डोळे डबडबले, जेव्हा हे वाचले.   "आवलीने दिली डब्यामध्ये खीर, घेई कर्मवीर लक्ष्मी साठी  किती तिच्या खस्ता विके मंगळसूत्र, झुरे दिनरात्र पोरांपायी  साऊची छाया तिच्या ठाई हाय, थोर तीही माय लेकरांची  भाऊंनी धरले पाया आवलीचे, बांध आसवांचे फुटलेले"  तुकोबा आणि गांधी भेटीत: "शोधला तो गाभा, भारताचा तुकोबांच्या खांद्यावर गांधी.."  असे अनेक विचारवंत तुकोबांच्या खांद्यावर बसले आणि म्हणून त्यांना आपला समतावादी, विवेकवादी संघर्ष यशस्वी करता आला. ...

वाचन कट्टा चर्चा -१

आज वाचन कट्ट्यावर चर्चा करण्यासाठी डॉ.नानासाहेब पवार, प्रा. गजेंद्र अहिवळे, डॉ. संजय झगडे, डॉ. संदीप राठोड, प्रा. किरण गाढवे, प्रा. समीर कुंभारकर आणि डॉ. दत्तात्रय संकपाळ हे उपस्थित होते. डॉ. दत्तात्रय संकपाळ यांनी कट्ट्याची भूमिका मांडली. तसेच त्यांनी नुकतेच वाचलेले पुस्तक डियर तुकोबा यावर संक्षिप्तपणे त्यांना भावलेले विचार मांडले. त्यावर सविस्तर परीक्षण ते कट्ट्यासाठी जमा केले. यावेळी उपस्थितांच्या काही सूचना खालीलप्रमाणे: १. डॉ.नानासाहेब पवार: वाचन कट्ट्याचे सभासदत्व घेतेलेल्या व कट्ट्याला उपस्थित सभासदाला एक पुस्तक उपक्रमांतर्गत दिले जाईल, मात्र त्या पुस्तकावर आपले परीक्षण त्यांनी पुढील कट्ट्याच्या भेटीत सदर करणे अनिवार्य असेल. २. प्रा. किरण गाढवे: आपल्या वर्गातील वाचनप्रिय विद्यार्थी ओळखून त्यांना या उपक्रमात सहभागी करून घेणे. ३. प्रा. गजेंद्र अहिवळे: लेखक-कवी निमंत्रित करणे. ४. प्रा. समीर कुंभारकर: कविता सदरीकरण या वाचन चळवळीची अशी छोट्या प्रमाणावर सुरवात करून अधिकाधिक वाचक जोडले जावेत यासाठी वाचनप्रिय मंडळी निश्चितच योगदान देतील.

वाचन कट्टा

आपल्या कट्ट्यावर चर्चा, स्वरचित कविता, पुस्तकातील आवडत्या उताऱ्याचे अभिवाचन आणि त्यावर चर्चा, bolg लेखन त्याबद्दल, कवी लेखकांशी संवाद, वर्तमानपत्रातील लेख, अग्रलेख यांवर चर्चा, पुस्तक परिचय सदरांवर चर्चा आणि यादी वाढत जाईल....