आज वाचन कट्ट्यावर चर्चा करण्यासाठी डॉ.नानासाहेब पवार, प्रा. गजेंद्र अहिवळे, डॉ. संजय झगडे, डॉ. संदीप राठोड, प्रा. किरण गाढवे, प्रा. समीर कुंभारकर आणि डॉ. दत्तात्रय संकपाळ हे उपस्थित होते. डॉ. दत्तात्रय संकपाळ यांनी कट्ट्याची भूमिका मांडली. तसेच त्यांनी नुकतेच वाचलेले पुस्तक डियर तुकोबा यावर संक्षिप्तपणे त्यांना भावलेले विचार मांडले. त्यावर सविस्तर परीक्षण ते कट्ट्यासाठी जमा केले. यावेळी उपस्थितांच्या काही सूचना खालीलप्रमाणे:
१. डॉ.नानासाहेब पवार: वाचन कट्ट्याचे सभासदत्व घेतेलेल्या व कट्ट्याला उपस्थित सभासदाला एक पुस्तक उपक्रमांतर्गत दिले जाईल, मात्र त्या पुस्तकावर आपले परीक्षण त्यांनी पुढील कट्ट्याच्या भेटीत सदर करणे अनिवार्य असेल.
२. प्रा. किरण गाढवे: आपल्या वर्गातील वाचनप्रिय विद्यार्थी ओळखून त्यांना या उपक्रमात सहभागी करून घेणे.
३. प्रा. गजेंद्र अहिवळे: लेखक-कवी निमंत्रित करणे.
४. प्रा. समीर कुंभारकर: कविता सदरीकरण
या वाचन चळवळीची अशी छोट्या प्रमाणावर सुरवात करून अधिकाधिक वाचक जोडले जावेत यासाठी वाचनप्रिय मंडळी निश्चितच योगदान देतील.
चालू घडामोडींवर आज चर्चा झाली. डॉ. तुषार घोरपडे सरांनी २०११ नंतरच्या अण्णा आंदोलन, केजरीवाल यांचा उदय आणि आजच्या राजकीय स्थित्यंतर इथपर्यंत चर्चा केली. डॉ. किरण गाढवे सरांनी नाटक, साहित्य, अभिव्यक्ती या विषयावर प्रकाश टाकला.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा