मुख्य सामग्रीवर वगळा

पुस्तक परिचय: विनायक होगडे लिखित डियर तुकोबा


#डियर_तुकोबा विनायक होगाडे यांची डियर तुकोबा ही कादंबरी वाचली. त्याबद्दल शेअर केल्यावाचून राहवत नाही. तुकोबा आणि अनेक देश परदेशातील विचारवंत यांची भेट काव्यरुपात पुस्तकाच्या सुरवातीला विनायक होगडे यांनी घडवली आहे. प्रत्येक भेट अंगावर काटा आणत आहे. प्रत्येक ओवी अंगावर शहारे आणते. या सगळ्या कविता घरातल्या ,शाळा, कॉलेजच्या भिंतीवर लिहून काढाव्या, असे वाटते. या सर्व भेटी होत असताना आपण त्याचे साक्षीदार आहोत असा भास होतो. डोळे पाणावतात. मीडिया trial मध्ये संतूच्या जागी, मुकाच्या जागी आपल्याच भावना आहेत असे वाटते. 
 डोळे डबडबले, जेव्हा हे वाचले. 
 "आवलीने दिली डब्यामध्ये खीर, घेई कर्मवीर लक्ष्मी साठी
 किती तिच्या खस्ता विके मंगळसूत्र, झुरे दिनरात्र पोरांपायी 
साऊची छाया तिच्या ठाई हाय, थोर तीही माय लेकरांची 
भाऊंनी धरले पाया आवलीचे, बांध आसवांचे फुटलेले" 

तुकोबा आणि गांधी भेटीत: "शोधला तो गाभा, भारताचा तुकोबांच्या खांद्यावर गांधी.." 
असे अनेक विचारवंत तुकोबांच्या खांद्यावर बसले आणि म्हणून त्यांना आपला समतावादी, विवेकवादी संघर्ष यशस्वी करता आला. They say, "We are standing on the shoulders of the giants." काहीच रटाळ वाटणार नाही. विचार पेरत पेरत.. आजच्या भाषेत.. आजच्या पिढीसाठी... तुकोबा कालातीत आहेत हेच अधोरेखित होते वारंवार. जबरदस्त मांडणी. अजिबात दुर्बोध नाही. हलकेफुलके. आकलनास सोपे. छोटेखानी पुस्तक. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांसाठी. 

 पुस्तकाचे शीर्षक: डियर तुकोबा 
लेखक: विनायक होगाडे 
प्रकाशक - मधुश्री पब्लिकेशन 
पृष्ठ संख्या - १६७ 
किंमत - रू २५०/ - - 


पुस्तक परिचय: दत्तात्रय संकपाळ

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कट्टा चर्चा १०

चालू घडामोडींवर आज चर्चा झाली. डॉ. तुषार घोरपडे सरांनी २०११ नंतरच्या अण्णा आंदोलन, केजरीवाल यांचा उदय आणि आजच्या राजकीय स्थित्यंतर इथपर्यंत चर्चा केली. डॉ. किरण गाढवे सरांनी नाटक, साहित्य, अभिव्यक्ती या विषयावर प्रकाश टाकला. 

वाचन कट्टा चर्चा ५

मोठ्या संख्येने वाचकांनी, विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आज कट्ट्यावर हजेरी लावली. कट्ट्यावर दिवसेंदिवस वाचकांची संख्या वाढत आहे हे आशादायी चित्र आहे. वेगवेगळ्या विषयांवर, पुस्तकांवर, चालू घडामोडींवर चर्चा केली.  माणूस पृथ्वीवर उपराच, तो आणि ती, नदिष्ट या पुस्तकांवर चर्चा झाली.  स्वामी विवेकानंद यांचे विचार, संत विचार, संत परंपरा, ज्ञानाचा प्रसार, ज्ञानाची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी केलेलं संतांच्या काळातील बंड आणि आजच्या काळापर्यंत त्याचे आलेले त्या बंडाचा वारसा याबाबत चर्चा झाली. श्रीकांत लक्ष्मी शंकर (मासूम) यांनी आज वाचन कट्ट्यामध्ये चर्चेसाठी हजेरी लावली. त्यांनी उपक्रमाचे कौतुक केले. यापुढेही ते कट्ट्यावर येत राहतील असे आश्वासन त्यांनी दिले. त्यांचे अनेक लेखक मित्र आहेत. त्यांच्या माध्यमातून लेखकांशी चर्चा घडवून आणली जाईल.